काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल !

0
20220301_095602

काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल !

शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

शिर्डी, दि. 1 मार्च:
काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिरा गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली. आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा. गोरगरीब माणूस ही खरी काँग्रेसची ताकद आहे त्याला सोबत घ्या. येणाऱ्या काळामध्ये सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात जोरदार कमबॅक करेल, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक संकटामध्ये जनतेच्या पाठीशी उभे राहिले. सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराचा कायदा, अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य कायदा, शिक्षणाचा कायदा हे महत्त्वाचे कायदे दिले.


यावेळी बोलताना प्रभारी एच के पाटीलम्हणाले की,
स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेला भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसह स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या माध्यमातून देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील सात वर्षापूर्वी आलेले भाजपाचे सरकार सातत्याने खोटे बोलत आहे. पंतप्रधान हे खोटे बोलून देश व जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्याची खोटी आश्वासने दिली. या उलट देशात तीन काळे कायदे लावून शेतकरी विरोधी निर्णय घेतला. भाजपापासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय असून काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा पक्ष आहे. डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून तरुणांना यामध्ये मोठी संधी असून महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल सभासद करावे असे आवाहन त्यांनी केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीन काळया कायद्याविरोधात राबवलेली शेतकऱ्यांची एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. थोरात हे राष्ट्र बांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्व असून देशपातळीवर त्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह संपूर्ण देशामध्ये ते लोकप्रिय असल्याचेही पाटील म्हणाले

माजी मंत्री पल्लम राजू म्हणाले की, काम कमी आणि जाहिरात ज्यादा असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. कोरोना संकटात केंद्र सरकार पूर्णपणे असफल ठरले असून भारतामध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध सूडबुद्धीने काम केले जात आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांच्या विरोधी असणारा केंद्र सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत बाळासाहेब थोरात यांना मोठी ताकद द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *