शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड

0
1234

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरावर इन्कम टॅक्सचा रेड.

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी:

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्री व नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा सिलसीला सुरुच असून आता शिवसेनेला झटका दिला आहे. शिवसेना नेते व मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरांवर इन्कम टॅक्सने धाड टाकली आहे. यशवंत जाधव हे शिवसेनेच्या ‘अर्थ’पुर्ण राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. ही कारवाई उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी आहे.

यशवंत जाधव यांच्या मुंबईतील माझगावमधील घरावर इन्कम टक्सने सकाळी सकाळीच ही कारवाई केली आहे. इमारतीबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना यशवंत जाधवांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई हा शिवसेनेला हा मोठा सेटबॅक समजला जातो. भाजपाचे किरिट सोमय्या दररोज एक एक गंबीर आरोप करत असून त्यानंतर केंद्रीय यंत्रणा कारवाई करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असूनही ते काहीच करत नसल्याचे दिसत आहे.

जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत घोटाळा करुन मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *