… आता आम्हा १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळावा !

0
BJP shelar

… आता आम्हा १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळावा !

मुंबई, दि. ३१ जानेवारी:

महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडेही त्यांनी सचिवांचे लक्ष वेधले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित केल्याच्या विरोधात १२ आमदारांतर्फे आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.

याबाबत १२ आमदारांच्यावतीने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रतही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *