पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील !

0
123

पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील !

मुंबई, दि. १७ जानेवारी:

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे.   शरद पवारांनी फडणवीसांना यापूर्वी ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आणि आताही ते बोलत राहिले तर ‘काशीचा घाट’ दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

मलिक पुढे म्हणाले की, शरद पवार मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत ज्या पक्षाच्या राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते शरद पवारांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.

फडणवीस आम्हाला साडेतीन जिल्हाचा पक्ष म्हणत आहेत तर इतर जिल्ह्यात आमचे जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातील आहेत याची माहिती त्यांनी घ्यावी. भाजपाला शरद पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. आता असेच ते भाष्य करत राहिले तर काशीचा घाट दाखवण्याचे कामही शरद पवार करतील, असे नवाब मलिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *