निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना करुन काय उपयोग?

0
IMG_20220111_110514

निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना करुन काय उपयोग?

निलंबित आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे लेखी बाजू मांडली.

मुंबई, दि. 11 जानेवारी :
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आमदारांचे निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हे विधानसभा उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असून हे निलंबन अन्यायकारक असल्याने या विरोधात भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि अन्य 11 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून ती प्रलंबित आहे. या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानभवन कार्यालयात सुनावणी ठेवली होती. त्याला 12 आमदारांच्यावतीने 6 आमदार उपस्थितीत होते. यामध्ये आमदार आशिष शेलार, जयकुमार रावल, योगेश सागर, अँड पराग अळवणी, नारायण कुचे, अभिमन्यू पवार आदींचा समावेश होता.

मीडियाला माहिती देताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांनी आम्हाला सुनावणीसाठी सन्मानाने बोलावले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. 12 आमदारांच्यावतीने आम्ही 6 आमदार उपस्थितीत होतो. आमचे कायदेशीर म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात विधानमंडळ सचिवालयाला आणि उपाध्यक्षांना दिले आहे. आमची कोणतीही चुक नसताना एकवर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यावेळी आमचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो ती याचिका प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हे आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *