… अन्यथा हा संप दोन महिने रेंगाळलाच नसता !

0
st

… अन्यथा हा संप दोन महिने रेंगाळलाच नसता !

मुंबई, दि. १० जानेवारी:

मागण्या करण्यात काहीही गैर नाही पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावे याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. दोन लाटांनंतर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या सगळ्याचा राज्याच्या अर्थकारणावर कुठेतरी परिणाम होत असतो. अशा परिस्थितीमध्येही परिवहनमंत्री आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य तितके जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. आता कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा रुजू होत एसटी सुरळीत कशी चालेल हे पाहावे. याआधीही एसटीचा संप झाला तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींशी अनेकदा चर्चा केली आहे. परंतु पहिल्यांदाच काहीजणांनी एसटी संघटना आणि सरकारने कामगारांच्या भल्यासाठी भूमिका घेऊनही ऐकायचेच नाही असा पवित्रा घेतला आहे त्यामुळे मागण्या मान्य करुनही राज्य सरकारला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अन्यथा हा संप दोन महिने रेंगाळलाच नसता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *