हिंमत असेल तर सरकारवर अविश्वास ठराव आणा:

0
IMG_20211223_112331

हिंमत असेल तर सरकारवर अविश्वास ठराव आणा:

मुंबई, दि. २३ डिसेंबर :
महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा असेही नवाब मलिक म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे. विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *