मनसेच्या रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !

0
rupali patil

मनसेच्या रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !

मुंबई दि. १७ डिसेंबर:

मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राजकीय प्रवास मागील अनेक वर्षांपासून पाहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करताना अनेक सामाजिक प्रश्नांवर लक्ष दिले आहे. पण मनसे पक्षाने दुजाभाव करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले. मनसेचा प्रभाव पुणे शहरात वाढविण्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या उल्लेखनीय कामाला डावलले गेले.

शरद पवार यांनी महिलांना मिळवून दिलेल्या आरक्षणातूनच आपल्या पक्षात आपण अनेक महिलांना संधी देऊ शकलो. यातूनच खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, रुपाली चाकणकर अशा अनेक भगिनींना राजकीय वाटचालीत आपण पुढे आणू शकलो. अशाच प्रकारे रुपाली पाटील ठोंबरे यांनादेखील पक्ष योग्य ती जबाबदारी देईल, असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह लावण्या शिंदे,  वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांचेही अजितदादा पवार यांनी पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *