टिळक व अण्णाभाऊंचे विचार आजही प्रेरणादायी!

0
IMG-20200801-WA0022

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२०

लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि लोकांमध्ये अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य स्मारक येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारीत लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशनही थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, रोहित टिळक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी चेंबूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त लोकशाहीरांना अभिवादन केले.
माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या व वर्गांच्या लोकांना एकत्रित करून लोकमान्यांनी स्वराज्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला. आण्णाभाऊ साठे यांनी गरीब, कष्टकरी, पीडित यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी आपल्या शाहीरीच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे. या महापुरुषांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर कार्य करणा-या केंद्रातील लोकविरोधी भाजप सरकारविरूद्ध पुन्हा स्वराज्याच्या लढा द्यावा लागणार आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी धर्मांध, जातीयवादी, हुकुमशाही विचारांच्या भारतीय जनता पक्षाविरोधात संघर्ष करणे हीच लोकमान्य टिळक व लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरेल असे थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *