‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच !

0
20201211_213858

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच !

मुंबई, दि. २७ आक्टोबर
जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समिती समोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे जलयुक्त शिवार कामाच्या गैरव्यवहारातून क्लिनचिट दिल्याची बातमी प्रसृत करण्यात आली आहे. असे राज्य सरकार तर्फे सांगण्यात आले आहे.

CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अंमलबजाणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे. या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने SIT नेमलेली होती. त्याप्रमाणे सुमारे ७१% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर SIT च्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्न येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *