पप्पू कलानींच्या सुनेसह २२ नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये
पप्पू कलानींच्या सुनेसह २२ नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये
उल्हासनगर दि. २७ ऑक्टोबर :
उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर कलानींच्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उल्हासनगरचा दौरा केला होते. भाजपचे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील असा सुतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाल्याने मंत्री जयंत पाटील आले आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ करून गेले अशी चर्चा उल्हासनगर शहराच्या राजकिय वर्तुळात सुरू आहे.
