अहंकार व राजकीय द्वेषापोटी ‘जलयुक्त शिवार’ बदनाम !
अहंकार व राजकीय द्वेषापोटी ‘जलयुक्त शिवार’ बदनाम !
मुंबई, दि. 27 आक्टोबर :
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडीकडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही..मग चौकशीअंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तरं दिली ?. जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचे क्षेत्र वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओमँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती.
मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
