‘त्या’ अनाथ बालकांना पाच लाखांचे सानुग्रह अनुदान !
‘त्या’ अनाथ बालकांना पाच लाखांचे सानुग्रह अनुदान !
मुंबई, दि. 25 ऑक्टोबर:
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील , महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ.सुशील वाघचोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.
कोरोना संसर्गात ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे, अशा बालकांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी व संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे आवश्यक होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील जवळपास 38 बालकांना महिला व बाल विकास विभागामार्फत पाच लाखाच्या मुदतठेव प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
