… तर कुणालाही शिंगावर घेण्याची धमक !
… तर कुणालाही शिंगावर घेण्याची धमक !
ठाणे दि. २४ ऑक्टोबर :
ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा एकेकाळी गड होता. मात्र हळूहळू आपला पक्ष इथे कमकुवत झाला असून यावर भाषण करून फार काही हाती लागणार नाही त्यासाठी एक अचूक रणनीती या भागासाठी करावी लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठाणे येथे केले.
ठाणे जिल्हयातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उर्जा आहे, काम करण्याची रग आहे, वेळ आली तर कुणालाही शिंगावरही घेण्याची धमक आहे. या ताकदीचा योग्य वापर करणे गरजेचे आहे त्यासाठी लवकरच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक नवा कार्यक्रम तयार केला जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
मधल्या काळात भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त आंदोलन केली. सध्याच्या परिस्थितीत वेगळे वातावरण असताना अशी आंदोलने घेतली त्याबद्दल ठाण्यातील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, ठाणे मनपा गटनेते नजीब मुल्ला, ठाणे मनपा विरोधी पक्षनेते शानू पठाण, मनपा गटनेता हनुमंत जगदाळे, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, सय्यद भाई, विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेता प्रमिला केणी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
