‘ते’ साखर कारखाने विकत घेणारे सर्वच पक्षामध्ये !

0
20211022_122305

‘ते’ साखर कारखाने विकत घेणारे सर्वच पक्षामध्ये !

मुंबई दि. २२ ऑक्टोबर :
राज्यातील एक – दोन साखर कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत तर जवळपास ६० ते ७० कारखाने दिलेले आहेत. यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

साखर कारखान्यांच्या खरेदी विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली असून अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार उत्तर देत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने ते आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. याप्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे.सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली आहे असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *