आता 10 वी 12 वीचे बोर्ड नाही, M,Phill पण बंद !

0
20200729_214318

नवी दिल्ली, दि, 29 जुलै

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले असून या नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाणार आहे. सध्याच्या १०+२ ऐवजी ५+३+३+४ अशी शैक्षणिक व्यवस्था असणार आहे. पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचं माध्यम केले जाणार असून सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश सुरु होणार. बोर्ड परीक्षेचे महत्त्व कमी केले जाणार आहे.

नविन शैक्षणिक बदल कसे असतील ?

एम फीलची डिग्री कायमची बंद होणार आहे.  देशातील प्रमुख आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित केली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी एकच नियामक संस्था असेल. खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम असतील. पाचवीपर्यंत मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असेल. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वयोमर्यादेत वाढ केली जाणार आहे. तर आता दोन शाखांचा अभ्यासही करता येणार आहे.  खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारस या नविन धोरणात आहे.

यापूर्वी १९८६ मध्ये शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले होते त्यात १९९२ मध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर आता ३४ वर्षांनी शैक्षणिक धोरण बदलण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *