दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही
दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही
मुंबई दि. ८ ऑक्टोबर :
छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते याची आठवण खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याचं कळलं तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही.
केंद्रसरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.
लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे अशा खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
