मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार

0
IMG-20210929-WA0036

मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत निर्धार

मुंबई, 30 सप्टेंबर :
सब का साथ सब का विकास या धोरणानुसार मोदी सरकारने आखलेल्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त करण्यात आला.

केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बार नकवी, राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आदींच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाची कार्यकारिणी बैठक आणि प्रशिक्षण शिबीर पार पडले.

मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख, मुंबई अध्यक्ष वसीम खान, प्रदेश सचिव इद्रीस मुलतानी, अहमद राणा हे मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण शिबीर आणि कार्यकारिणी बैठकीत खा.जफर इस्लाम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चित्राताई वाघ, माजी मंत्री आशिष शेलार, आ.अतुल भातखळकर, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारिणी बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. भगवद्‌गीता राष्ट्रीय स्पर्धेची विजेती मरीयम सिद्दीकी हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. गायक हरपीत सिंग यांच्या ”मोदीजी वन्स अगेन” या गीताचे लोकार्पणही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *