… तडीपार करणारे नोटीसवर गळे काढत आहेत ?

0
20210919_225210

….. तडीपार करणारे नोटीसवर गळे काढत आहेत ?

मुंबई, दि. 19 सप्टेंबर:
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांनी अडववलं म्हणून सोमय्या यांनी थयथयाट केला. त्यावर राजकीय वातावरणही तापलं. या प्रकरणात काँग्रेसने उडी घेत भाजपा व सोमय्या यांना खडे बोल सुनावले. फडणवीस सरकारच्या काळात केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तडीपार करणारे, सभेत काळे कपडे घालण्यास मनाई करणारे व आंदोलनाआधीच स्थानबद्ध करणारे भाजपा नेते सोमय्यांना नोटीस दिली म्हणून गळे काढत आहेत? असा सवाल सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सोमय्या यांचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की,
सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत.ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा असे म्हटले आहे.

दुसऱ्याच्या मालमत्ता तिसऱ्याची म्हणून सांगितल्यावर लोक बोंब मारणार की नाही? सोमय्यांच्या नौटकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हा बंदी आहे. सोमय्या तक्रारी करत आहेत ना !. नाहीतरी राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या आहेत मग त्यांचे काम भाजपाच करणार का? सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी म्हणून दाखवतात म्हणून जनतेत घबराट आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *