जळगावमधील वरणगांव तळवेल सिंचन योजनेचा शुभारंभ

0
IMG_20210902_214622

जळगावमधील वरणगांव तळवेल सिंचन योजनेचा शुभारंभ

बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील ५२ गावांना होणार लाभ.

मुंबई दि. २ सप्टेंबर :
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते.

वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस असून जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी या योजनेचा शुभारंभ करून त्यांना एक आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *