विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचा मुख्यमंत्री निधीस धनादेश
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचा मुख्यमंत्री निधीस धनादेश
मुंबई, दि. 25 ऑगस्ट:
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने पुरग्रस्त भागात झालेल्या नुकसानासाठी ६ लाख ४६ हजार २६० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी मदत म्हणून ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हाती सुपूर्द केला.
तिन्ही वीज कंपनीत कार्यरत असणाऱ्या एक प्रमुख विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छेने पुरग्रस्त व भूस्खलन नुकसान झालेल्यांसाठी संघटनेच्या अधिपत्याखालील पतसंस्थांनी २ लाख ११ हजार ५३० रुपये व इतर पदाधिकारी, निवृत्त पदाधिकारी यांनी ४ लाख ३४ हजार ७३० रुपये असे एकूण ६ लाख ४६ हजार २६० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस उपलब्ध करून दिला.
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून खारीचा वाटा उचलल्याबद्दल युनियनच्या प्रतिनिधींचे आभार मानले.
यावेळी युनियनचे सरचिटणीस आर. देवकांत, विश्वस्त निर्वाहभत्ता शैलेश पेंडसे, संपादक तांत्रिक शक्ती राम चव्हाण, मुंबई प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.
