आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही,”धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते
आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही,”धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते
धुळे , दि. 4 ऑगस्ट :
राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घणाघाती शब्दात भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर धुळे येथील पत्रकार परिषदेत हल्ला चढवला.
आमदार आशिष शेलार हे तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्या नंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
धुळे जिल्हा परिषदेतील कोटय़वधींच्या अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्कर म्हणेल बाप रे बाब! असे चित्र सध्या आहे.
पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले. अधिकऱ्यांमध्ये वाँर सुरु आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत. दलालांमार्फत बदलत्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत.
दुसरीकडे सरकारची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी राज्यात स्थीती पहायला मिळते आहे
प्रशासनावर कुणाची पकड नाही. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे उघड होते आहेत.तर बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे एकिकडे राज्यात कोरोना, पाऊस, वादळ अशा आपत्तींनी थैमान घातले आहे, अशावेळी प्रशासनामध्ये यादवी माजली आहे. कुणाचे कोण ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळे राज्याची दिशा कोणती हे कळत नाही असे चित्र आहे.
सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्ष प्रमुखां विषयी वक्तव्य येतात, त्यावरून वाद होतात तीनही पक्षांमध्ये बेदिली माजलेली आहे या बेदिलीमुळे नेतृत्वाची बेअदबी ते करीत आहेत. शेतकरी, कामगार, श्रमिक, अलुतेदार, बलुतेदार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही. म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेचा आवाज बनतो आहोत.या सरकार विरोधात ऐल्गार आम्ही करु, असेही त्यांनी सांगितले.
