तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

0
IMG_20210723_152524

तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

विरोध पक्षनेते प्रविण दरेकर तळये गावातील घटनास्थळी दाखल.

 

महाड, दि. २३ जुलै :
तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली आहे. मी आता त्या गावातच आहे. आमच्या सोबत माजी मंत्री गिरिष महाजन, आमदार निरंजन डावखरे सुध्दा उपस्थित आहेत. काल सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे, ४ वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंबहुना गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

दरेकर म्हणाले की, शासकीय यंत्रणा तोकडी आहे,
आज सांगतात संपर्क साधू शकत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफ ची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली, दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केल, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यानं तेथून बाहेर काढले त्यामुळे त्यांनी दिलासा दिला असून प्रशासकीय अधिकार न आल्यामुळे ही शरम वाटणारी गोष्ट आहे. अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्ही सुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिलं नाही. सरकार ५ लाख देतील १० लाख देतील परंतु गेलेलं जीव परत येणार नाही. प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा. आणि खाण्याचे आणी पिण्याची व्यवस्था करा. असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *