राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात !

0
20210503_195418

राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात !

पिंपरी चिचवड, दि. 21 जुलै :
शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लाॅकडाऊन, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे राज्यासमोर अनेक प्रश्न आ-वासून उभे आहेत. मात्र सगळे प्रश्न कोमात आणि सरकार मधील तीन पक्षांमध्ये स्वळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात आहे, अशी खरमरीत टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

आमदार आशिष शेलार आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असून संघटनात्मक आढावा बैठका ते घेत आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, रोज सकाळ-संध्याकाळ तीन पक्षांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आम्ही “स्वबळावर लढणार.. आम्ही स्वबळावर लढणार… एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहीणार… मग तीसरे दुसऱ्याला भेटायला जाणार… मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही. हा दुसरे काही येत असेल तर लेडीज बारची छमछम ऐकू येते हे मिडियानेच उघड केले. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असून त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही.

महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाॅर सुरु आहे. मात्र रोज सकाळी “सरकार पाच वर्षे टीकणार” हा जप पहिल्यांंदा सर्व मंत्री 108 वेळा करतात..मग स्वबळ…असे दुर्दैवी चित्र आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच पुण्यात भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 सुरु असून पुणे पीएमआरडीए करुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सुरु आहे. 50 हजार कोटींचे भूखंड या प्राधिकरणाकडे गेले कसे? या समितीत भाजपाचे आमदार का नाहीत? यातून एक मोठा घोटाळा केला जात असून आम्ही तेही योग्यवेळी ऊघड करु, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *