पंकजा मुंडेंच्या ‘महाभारतातील’ ‘शकुनी’मामा कोण?

0
20210713_185655

पंकजा मुंडेंच्या ‘महाभारतातील’ ‘शकुनी’मामा कोण ?

मुंबई, दि. १३ जुलै :
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रितम मुंडे यांना डावलल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करुन राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले. आपले नेते मोदी, शहा, नड्डा आहेत असा सांगत देवेंद्र फडणवीस यांचा नामाल्लेख मात्र त्यांनी टाळला. आता येथे राम नाही असे ज्या दिवशी वाटेल त्यादिवशी बघु असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपले इरादे स्पष्ट केले.

पंकजा म्हणाल्या, कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, हे धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस वैयक्तिक हेतूने कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू.

कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नव्हते. काळ कधीच थांबत नसतो. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत.

पंकजा मुंडे यांनी आज संघर्षाची दिशा दाखवताना महाभारताचे दाखले दिले. कौरव, पांडवांचा त्यांनी उल्लेख केला मग या महाभारतातील शकुनीमामा कोण याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी टाळला असला तरी जनतेला मात्र ते चांगलेच उमगले असून हा संघर्ष थांबणार नाही असेच दिसते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *