फडणविसपंत, त्या माहितीमध्ये ८ कोटी चुका तुम्हाला कशा कळल्या?

0
20210710_133923

फडणविसपंत, त्या माहितीमध्ये ८ कोटी चुका तुम्हाला कशा कळल्या?

हरी नरके यांचे फडणवीस यांना चर्चेचे खुले आव्हान.

मुंबई, दि. 10 जुलै:

ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार करत आहेत. यातील कळीचा मुद्दा हा इम्पीरिकल डेटाचा आहे, तो केंद्र सरकारकडे आहे आणि ते हा डेटा देत नाहीत त्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे असा युक्तिवाद केला जातो. पण हा डाटाच चुकीचा असल्याचा फडणवीस यांचा दावा आहे. या प्रकरणावर ओबीसी विषयाचे अभ्यासक हरी नरके यांनी भाजपा व देवेंद्र फडणवीस याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

सरी नरके म्हणतात, फडणवीस प्रश्नांपासून पळ काढू नका.१) केंद्राचा डेटा मागू नका म्हणता तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता?(२)तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय,तरी त्वरा करा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना का लिहिले होते?तुम्ही आठ आठवड्यात ही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचे.(३)जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता?(४) त्या माहितीत ८ कोटी चुका असल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला? केंद्र सरकारने तुम्हाला डझनावारी पत्रे लिहिली त्यात तर एकाही चुकीचा उल्लेख नाही,मग हा डेटा न बघताच तुम्हाला८ कोटी चुका असल्याचा भास झाला का?

(५)तुमच्या मातृसंस्थेने जातगणनेला लेखी विरोध केला होता (२४/५/२०१०) म्हणून तीत चुका असल्याचा डँका तुम्ही पिटताय. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. (६) ३महिन्यात डेटा जमवता येतो तर ६० महिने काय केले? (७) डेटात चुका होत्या तर मोदी सरकारने नवा, बिनचूक obcडेटा गेल्या ७ वर्षात का जमवला नाही?(८) न्या. रोहिणी आयोगाला डेटा दिला नाही म्हणता, मग ज्यांच्या ताब्यात तो आहे त्या RGI ना या आयोगात सदस्य कशासाठी नेमलंय ? (९) केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या? फडणविसपंत, प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत, जाहीर उत्तरे द्या, पळ काढू नका.”आरक्षण मुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना “बहुजनांचा बुद्धीभेद नी शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो, आहे हिम्मत ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *