भाजपाचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित!

0
20210218_235058

भाजपाचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित!

मुंबई, दि. ५ जुलै २०२१
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

आशिष शेलार, पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या आमदारांना निलंबित करण्यात आले.

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभागृह तहकूब झाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली अशी माहिती स्वत: तालिका अध्यक्षांनी सभागृहाला दिली.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *