‘जलयुक्त शिवार’च्या कामाचा दर्जा एकदम तकलादू
‘जलयुक्त शिवार’च्या कामाचा दर्जा तर एकदम तकलादू
नांदेड, दि. २७ जून :
जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला मात्र त्याचा रिझल्ट आला नाही. कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
जयंत पाटील म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी अशी मागणी सव्वा वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असावी. जलयुक्त योजनेत ७२ टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती परंतु ७२ टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. मात्र त्यांनी सांगितलेली परिस्थिती तशी नाहीय. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
