ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे 26 जूनला चक्काजाम!

0
IMG_20210618_215105

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे 26 जूनला चक्काजाम!

मुंबई, दि. 18 जून :

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आज एक बैठक झाली. या बैठकीला पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्राताई वाघ आणि इतरही सहकारी उपस्थित होते.

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *