मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहणार !

0
20201115_095930

मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहणार !

मुंबई, दि. १३ जून :
शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे, असे मी रोखठोक मध्ये म्हटलेले आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसे इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून झाली आहे आणि शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच म्हटले आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्या कुणाचाही मनात संभ्रम नाही. पण प्रसिद्धीमाध्यमांमुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आणि मी त्या प्रक्रियेतील एक घटक होतो, अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत, मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *