… तरीही 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार !

0
IMG-20210613-WA0038

… तरीही 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार !

मुंबई दि. 13 जून :
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांची भेट गेल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपानंतर रामदास आठवले यांनीही या भेटीवर आपल्या खास शैलीत मत व्यक्त केले आहे. प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी ; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी? असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदीं सोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी रणनिती आखली नाही त्या राज्यांतही भाजपला विजय मिळालेला आहे.

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होईल आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *