भाजपविरोधात सशक्त मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न.

0
20210612_223046

भाजपविरोधात सशक्त मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न.

मुंबई दि. १२ जून :
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली असल्याचे मलिक म्हणाले.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी शरद पवार यांची सिलव्हर ओक वर तब्बल तीन तास चर्चा केली. प्रशांत किशोर यांनी नुकतेच प. बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षासाठी काम केले आहे. पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले होते त्यावर नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *