तुमचा महाराष्ट्र पोलीसांवर विश्वास नाही ?

0
20210611_191340

तुमचा महाराष्ट्र पोलीसांवर विश्वास नाही ?

परमविरसिंह यांना झटका; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली.

नवी दिल्ली, 11 जून:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने आज जोरदार झटका देत त्यांची याचिका फेटाळली. आपल्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे या चौकशी सोपवाव्यात. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे चौकशीदरम्यान उल्लंघन झाले आहे असे परमविरसिंह यांच्या याचिकेत म्हटले होते.

कोर्ट म्हणाले “तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसात काम करत आहात तरीपण तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. दाखल असलेल्या सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता.परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला आहे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर सुरु करण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी केली होती.

परमविरसिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. परंतु या सर्व तक्रारी सुडबुद्धीने केल्या असल्याची तक्रार परमबीरसिंह यांनी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा खळबळजनक दावा केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *