राष्ट्रवादी-शिवसेना आगामी लोकसभा विधानसभा एकत्र लढणार ?

0
IMG-20210610-WA0037

राष्ट्रवादी-शिवसेना आगामी लोकसभा विधानसभा एकत्र लढणार ?

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार.

मुंबई, दि. 10 जून :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील आगामी राजकीय गणिताचे संकेत दिले आहेत.
शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं पण आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

पवार पुढे म्हणाले की, आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे असे बोलून उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर शंका उपस्थित करणा-यांनाही उत्तर दिले.

शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवता पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

राज्यातील हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,” असे म्हणतात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या राजकीय बेरजेचे स्पष्ट संकेत दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *