गोल्डस्मित कोऑर्डिनेशन कमिटीद्वारा रक्तदान शिबिर !
गोल्डस्मित कोऑर्डिनेशन कमिटीद्वारा रक्तदान शिबिर !
मुंबई, दि. 9 जून :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता प्रत्येक अडचणीच्या काळात सदैव सामाजिक दायित्व जोपासणा-या गोल्डस्मित कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष व श्री.सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजारामजी देशमुख यांच्या पुढाकाराने झवेरी बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिरात सुवर्ण व्यापारी बांधवांनी व कारागिरांनी कमिटीचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी रक्तदान करण्यासंदर्भात केलेल्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन इंडिया बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. राजाराम देशमुख यांच्या हस्ते कोरोनाशी लढा देत असतेवेळी अत्यंत उपयुक्त ठरेल असे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे ह्युमीनिटी बुस्टर, गरम वाफ घेता येईल असे स्टीमर मशीन, इनस्टंट पाॅकेट सॅनिटाझर, सॅनिटाझर बोट्लस व छत्री ह्या भेटवस्तूंच्या किट सह गोल्डस्मित काॅडीनेशन कमिटी व के. ई. एम. हाॅस्पिटल रक्तपेढीचे ( बल्ड बँकेचे ) रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देऊन सर्व रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कन्हैया कक्कड, सुरेंद्र मेहता, स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित, राजू जैन, आदिप पेडणेकर, जितेंद्र देशमुख, संदीप जाधव, प्रदीप कर्नर, प्रविण पाष्ठे, प्रमोद नाग ह्या सर्व मान्यवर व्यापारयांसह मुंबईचे ACP शरद नाईक, मुंबई काँग्रेसच्या रोजगार व स्वयं रोजगार विभागाचे पदाधिकारी युवक विनायक देसाई, हेमंत राऊत, स्वप्निल साळवी, अथर्व परब, माहिम युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सिद्धेश मयेकर यांच्यासह के.ई.एम. हाॅस्पिटलचे डाॅक्टर्स व त्यांची टिम उपस्थित होती.
