मोहोळ तालुक्यातील आष्टीच्या सरपंचाशी मुख्यमंत्र्यांचा संवाद.
मोहोळ तालुक्यातील आष्टीच्या सरपंचाशी मुख्यमंत्र्यांचा संवाद.
जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे कौतुक.
सोलापूर, दि. 9 जून:
मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहेत. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचाशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यातील डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता अक्कलकोटच्या सरपंच दिपाली आळगी, आंधळगाव ता मंगळवेढाचे सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता. मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होते.
डाॅ. व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माझ गाव कोरोना मुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने विविध पंधरा अभियाने दिली. त्यातून आम्ही गावातील सिल्वर ओक स्कुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरमधून बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंटची मानसिक स्थिती चांगली राहिल याकडे लक्ष दिले. मी डाॅक्टर असल्यामुळे मी देखील रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान सुरू केले. यामध्ये आम्ही टेस्टींग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला. जिल्हा परिषेदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणीसाठी चांगली मदत झाल्याचे डाॅ. व्यवहारे यांनी सांगितले.
सरपंचाशी झालेल्या महासंवादाच्या कार्यक्रमात कोरोनामुक्तीबरोबर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले ग्रामपंचायतीचे सरपंच यांना प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होण्यासाठी यापूर्वी आवाहन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.
