सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण !

0
20210529_222420

सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण !

सोलापूर, दि. 29 मे :
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून मुक्त झालेल्या आणि रक्तामध्ये शर्करा असणाऱ्या नागरिकांना म्युकरमायकोसिसचा असलेला धोका ओळखून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

पालकमंत्री भरणे म्हणाले, 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांची तपासणी केली जाते. याचपद्धतीने उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात 31 मे ते 5 जून या सप्ताहात अभियान राबवून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा. म्युकरमायकोसिसचा धोका ओळखण्यासाठी दंतचिकित्सकाकडून दंत तपासणी, रक्तशर्करेचे प्रमाण तपासले जाणार आहे. या तपासण्या मोफत करण्यात येणार असून नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका. शासनाकडे जादा मागणी नोंदवून रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनशिवाय दुसऱ्या प्रभावी इंजेक्शनची माहिती घ्या. औषधे असतील तर त्याचाही विचार करा. आज 500 इंजेक्शन प्राप्त झाली असून इंजेक्शनशिवाय म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यू होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *