सोशल मीडियावर मेसेज पाठवण्याआधी विचार करा!
मुंबई दि. १० जुलै २०२०
व्हाट्सऍपसह कोणत्याही सोशल मीडियावर जर तुम्ही चुकीचे, अफवा पसरवणारे मेसेजेच फॉरवर्ड करत असाल तर ते करु नका.. असे मेसेजेस पाठवणारावर सायबर पोलिसांचे खास लक्ष आहे, तेंव्हा खबरदारी बाळगा…
सोशल मीडीयावर असे अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, तसेच कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
सोशल मीडियातील मेसेज व व्हाट्सअप ऍडमीनने काय करावे याची नियमावलीच साबर विभागाने जारी केली आहे. ती काळजीपूर्वक वाचा…
व्हाट्सअँप वापरताना घ्यावयाची दक्षता….
तुम्ही व्हाट्सऍप ग्रुपचे सदस्य असाल तर काय करावे?
चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये.
आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये.
जर आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी,चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडिओज, मेमे किंवा पोस्ट्स येत असतील की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप ऍडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण देऊ शकता.
ग्रुप ऍडमिन, (creator) असाल तर काय करावे?…..
ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य (member) हा एक जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करावे. ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगावी. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा. परिस्थिती अनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून *only admin* असे करावे, जेणे करून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे…
