… म्हणून उत्तरप्रदेशमध्ये मृतदेह नदीत सोडत असावेत !
… म्हणून उत्तरप्रदेशमध्ये मृतदेह नदीत सोडत असावेत !
मुंबई दि. १३ मे :
उत्तरप्रदेश सरकारला कोरोनाचा सामना करण्यात अपयश आले आहे, म्हणूनच स्मशानभूमी कमी पडत असावी, काही समस्या असेल, म्हणून मृतदेह नदीत सोडत असावेत, मात्र उत्तरप्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केली.
आता लसीकरण हाच समस्येवर उपाय आहे. दुसर्या लससाठी केंद्राकडून लस येणे अपेक्षित होते, मात्र ती लस येत नाहीय,दोन लसीमधील अंतर वाढले तर फरक पडेल का ?याची शास्त्रीयदृष्ट्या माहीती नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता लस निर्मितीचे कारखाने इथे उभे करायला पाहिजेत असे मतही जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
