‘तो’ मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ नव्हता .
‘तो’ मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ नव्हता .
मुंबई, दि. 11 मे :
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने यात राष्ट्रपती व केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
ते म्हणाले की, ‘आधी केलेला कायदा फूलप्रूफ नव्हता. तो जर फूलप्रूफ असता तर या करणासाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आमच्यावर आली नसती.
‘मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असं सांगितले आहे, त्या अनुषंगाने आम्ही राज्यपाल यांना भेटलो. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
