कोरोना महामारीत उत्तरप्रदेश, बिहार रामभरोसे !

0
20201217_123854

कोरोना महामारीत उत्तरप्रदेश, बिहार रामभरोसे !

मुंबई दि. ११ मे :
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते दिसली आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेते जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *