आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा !

0
20210507_213037

आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा !

शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र…

मुंबई दि. ७ मे :
आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेत त्यांना अवगत केले. शरद पवार यांनी व्यावसायिकांना प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *