कोरोनाप्रश्नी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले !

0
20201028_183111

कोरोनाप्रश्नी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले !

नवी दिल्ली, दि. 6 मे :

कोरोनाच्या दुस-या लाटेत देशभरातून रुग्ण संख्या वाढत आहे तसेच मृत्यू ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. जगभरात भारताची नाच्चकी होत असून मोदी सरकारच्या ढिसाळ नियोजनाची फटका देशातील जनतेला भोगावा लागत आहे. जगभरातील प्रसार माध्यमांनी देशातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली. आता न्यायालयेही सरकारच्या नियोजनवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.

सुप्रीम कोर्टाने तिसऱ्या लाटेसंदर्भातील केंद्र सरकारच्या तयारीपासून ते दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातील अनेक प्रश्न केंद्र सरकारला विचारले.
केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी संबंधित सुनावणी दिल्लीसंदर्भात सुरु असल्याचं म्हटलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही संपूर्ण देशाचा विचार करत आहोत असं म्हटले.
सरकारने जनतेला उत्तर देणं अपेक्षित आहे असं सांगत दोन वर्षांनी निवडणूक लढणार आहात आम्ही नाही, या शब्दांमध्ये केंद्र सरकारला सुनावले.

देशात आता दुसरी लाट आहे, तिसरी लाटही येणार आहे. त्यासंदर्भात केंद्राने काय तयारी केलीय? तेव्हाची आव्हाने वेगळी असतील. त्यासाठी आपण सध्या काय करत आहोत? दूर्गम भागातील परिसरासंदर्भात काय नियोजन आहे ? भविष्यातील तयारी कशी सुरु आहे ? काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसं काम करणार ? लहान मुलांना संसर्ग झाला तर त्यांचे आई-वडील काय करणार?, हे पालक त्यांच्या मुलांसोबत रुग्णालयांमध्ये थांबणार की काय करणार?, सरकारने काय नियोजन केलं आहे? लहान मुलांच्या लसीकरणाचा काय विचार केला आहे?, असे अनेक प्रश्न केंद्र सरकारला विचारले.

जनता त्रस्त आहे, न्यायालय विचारणा करत आहेत पण केंद्र सरकार चा कारभार मात्र सुस्तावलेलाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *