स्वामी समर्थ भेटणार शेतकऱ्याला; ‘देऊळबंद’च्या सिक्वलची घोषणा !

0
SAMARTH S

मुंबई, दि. ७ जुलै २०२०

देऊळबंद हा अक्कलकोट स्वामी समर्थ यांची महती सांगणारा चित्रपट तुम्हाला आठवतो. २०१५ साली आलेल्या या चित्रपटाने लोकांच्या मनात घर केले होते. स्वामी समर्थांच्या भक्तांना तर हा चित्रपट एक आत्मिय समाधान देऊन गेला. आता याच ‘देऊळबंद’चा सिक्वल येतोय.

मराठीतील स्टार अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे पाच वर्षानंतर आता त्याचा सिक्वल ‘देऊळ बंद 2 ..आता परिक्षा देवाची’, या नावाने चित्रपटाची निर्मिती करत आहे. गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने प्रविणने या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली. पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट रिलीज होईल असे निर्मात्या जुईली वाणी-परदेशी यांनी सांगितले. देऊळ बंदमध्ये स्वामी समर्थ एका शास्त्रज्ञाला भेटले होते आता या सिक्वलमध्ये स्वामींना शेतकरी भेटणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. देऊळ बंदमध्ये शास्त्रज्ञाच्या भुमिकेत गश्मीर महाजनी तर स्वामींच्या भुमिकेत मोहन जोशी झळकले होते. या नव्या चित्रपटातील मुख्य भुमिका कोण करत आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *