भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचे ‘महाजॉब्स’ वेबपोर्टल !

0
Mahajobs

मुंबई, दि. ६ जुलै २०२०

राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले असून नवे उद्योगही येऊ घातले आहेत. राज्य सरकारने सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करारही केले आहेत. याखेरीज नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी महापरवाना देण्यात येत आहे. यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे आपापल्या राज्यात गेलेले कामगार परत कधी येतील हे निश्चित नाही त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती या महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करायची आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *