अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा !

0
FB_IMG_1609316665692

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा !

मुंबई, दि. 5 एप्रिल:
महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला. परमबीरसिंह यांनी देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर परमबीरसिंह हे गृहमंत्री यांची सीबीआय चौकशी करा यासाठी कोर्टात गेले होते. शेवटी काय कोर्टाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यात आला आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *