लाॅकडाऊन करायचा असेल तर लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा करा !

0
20210326_202326

लाॅकडाऊन करायचा असेल तर लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा करा !

कराड, दि. ३० मार्च:

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत.या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे याचा शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण पुढे म्हणतात की,लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्यावी, तसेच लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवावा. खाजगी वाहनातून प्रवासास मुभा दिली पाहिजे. शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नये आणि लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवावे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *