मनसुख हिरेन प्रकरणी पुरव्यांशी छेडछाड !

0
20201121_120635

मनसुख हिरेन प्रकरणी पुरव्यांशी छेडछाड !

‘ते’ रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब …

मुंबई, दि. 26 मार्च:
मनसुख हिरन यांचा मृतदेह ज्यावेळी सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडावर सफेद रुमाल असल्याचे सर्वांनीच पाहिले होते मात्र हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाल्याचे उघड करीत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी हिरन यांच्या केसमधील अनेक पुरव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला. या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए ने करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले की, मनसुख हिरन प्रकरण दाबण्यासाठी सरकारमधील कोण मंत्री काम करीत होते. महाराष्ट्रात गेले काही दिवस जे सुरू आहे त्यातील ब-याच प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला द्यावी लागणार आहेत. कारण अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. कारण हे प्रश्न आपल्या कु कृत्यामुळे ठाकरे सरकारमधील अधिकारी निर्माण करीत आहेत.

मनसुख हिरन यांच्या खूनाचे प्रकरण आता एनआयएकडे गेले आहे. पण एनआयएकडे जाण्याआधी याप्रकरणी ठाकरे सरकार ही केस एनआयएकडे देण्यास तयार नव्हती. न्यायालयातून आदेश आल्यानंतर सुध्दा ही केस ठाकरे सरकार एनआयएकडे देण्यास तयार होत नव्हते. वारंवार केंद्रीय गृह सचिवांनी या केसमधील कागदपत्रांची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली पण तरीही हे सरकार कागदपत्रे देण्यास तयार नव्हते. शेवटी ठाण्याच्या न्यायालयाने निर्देश दिले त्यामुळे ठाकरे संरकारसमोर अन्य पर्यायच उरला नाही. त्यावेळी ही कागदपत्रे एटीएसकडून एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आली.

राज्य सरकार मनसुख हिरेन यांची केस आपल्याकडेच का ठेवू पाहत होते. त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या केसमध्ये राज्य सरकारमधील मंत्री, नेते, अधिकारी मिळून एक मोठे षडयंत्र रचून या केसमधील पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे, तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करीत होते.

मनसुख यांचे शव जेव्हा मुंब्र्याच्या खाडीत सापडले त्यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मनसुख यांच्या तोंडावर रुमाल होते. मात्र त्यांच्या छवविच्छेदन अवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेलया वस्तुंची जी नोंद आहे त्यामध्ये या रुमालांची नोंद नाही हे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अहवालच उघड करून आज मिडियासमोर आणले. मग हा महत्वाचा पुरवावा पोलीसांनी कुणाच्या सांगण्यावरून नष्ट केला असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यानी केला.
मनसुख यांच्या सारख्या केसमध्ये शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मनावायोगाच्या नियमाप्रमाणे संपुर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडिओ का बनविण्यात आल्या. संपुर्ण चित्रण का करण्यात आले नाही. डॉक्टरांना तसे आदेश कुणी दिले होते. सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी पुरव्यांशी छेडछाड कुणाच्या सांगण्यावरून केले तो मंत्री कोण तो नेता कोण असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.

ज्यावेळी मृतदेहाच्या फुफुसामध्ये पाणी सापडले तर त्या पाण्याची डायटोम टेस्ट करणे आवश्यक होते. हिरेन यांच्या शरिरिरात पाणी सापडले नाही तरी मग त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले. ही टेस्ट जे जे रुण्णालयात होत नाही तशी परवानगी या रूग्णालयाला नाही तरीही मनसुख यांचे अवयव जे जे रूग्णालयात का उघडण्यात आले. जे जे रूग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही फक्त अवयवांचे स्कँनिग केले, टेस्ट करण्यात आली नाही मग या अवयावयांची छेडछाड करण्यासाठीच ते जे जे रुग्णालयात आणण्यात आले होते का असा सवाल करत मनुसख हिरन यांनी आत्महत्या केली हे दाखवण्यासाठी ही डायटोन टेस्ट करण्याचा घाट घालण्यात आला असा आरोपही त्यांनी केला आहे.

जेव्हा हे प्रकरण एटीएसकडे गेले त्यावेळी एटीएसला लक्षात आले की या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेले रुमाल गायब आहेत, शवविच्छेदनाचे संपुर्ण चित्रीकरण नाही, तसेच डायटोम टेस्ट नाही, त्यासाठी आवश्यक असलेले अवयव उघडण्यात आले आहेत त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली आहे त्यामुळे कर्तबगार एटीएसने या प्रकरणी छापे मारून पुरावे गोळा करण्याचे निश्चित करण्यात आले त्यासाठी आवश्यक असलेले शासकीय पंचांना २० मार्चला बोलावून सहा विविध ठिकाणी छापे मारण्याचे एटीएसने ठरवले. त्यासाठीची तयारी पुर्ण केली. सहा ग्रृप तयार करण्यात आले पण चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एटीएसला छापेमारी करण्याची परवागी सरकारने दिली नाही. त्यानंतरही छापेमारी करू दिली नाही. एटीएसला छापेमारी करून पुरावे गोळा करण्यास कोणी रोखले. त्याचे निर्देश कोणत्या मंत्र्यांनी दिले. असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.

स्थानिक पोलीसांना काम करू दिले नाही. जे केले ते चुकीचे केले. पुराव्यात छेडछाड करण्यात आली. एटीएसला छापेमारी करू दिली नाही. म्हणून राज्य सकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती. म्हणून एनआयए ने या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *