कुंटेचा ‘तो’ अहवाल ‘प्रभादेवी’च्या मुख्यपत्र कार्यालयातून!

0
20201106_190347

कुंटेचा ‘तो’ अहवाल ‘प्रभादेवी’च्या मुख्यपत्र कार्यालयातून !

मुंबई, दि. 26 मार्च:
पोलीस बदल्यांचे रॅकेट आणि फोन टॅपिंगने राज्यातील राजकारण तापले आहे. फडणवीस यांनी केलेल्या खळबळजनक दावा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालानुसार खोटा ठरला. असे असले तरी भाजपानी त्यावरही आरोपांची राळ उडवून दिली आहे.

एक दिवस आधी चौकशीची मागणी केली जाते आणि रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणी दुस-या दिवशी सीताराम कुंटे चौकशी अहवाल सादर करतात. हा अहवाल पण व्हाईट वॉश लावणाराच आहे.आपले काळे झाकण्यासाठी पांढरारंग लावण्याचा प्रकार आहे. हा अहवाल पाहिल्यावर लक्षात येईल की या अहवालाची निमिर्ती प्रभादेवीच्या मुख्यपत्राच्या कार्यायातून झाली आहे, असा टोमणा भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

शेलार म्हणतात, ‘ जेव्हापासून राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून प्रत्येक विषयात जनतेची दिशाभूल करण्यात येते आहे. मनसुख हिरन यांच्या केसमध्ये तर हे वारंवार दिसून आले आहे. प्रथम सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न झाला मग गाडीचा तपास एनआयए करू लागल्यावर मनसुख यांची केस एनआएकडे देण्यास नकार देण्यात आला. त्यातील पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली. त्यामुळे ठाकरे सरकारची सुरुवाती पासूनची भूमिका पाहता हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे.

राज्य सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेली निवृत्त न्यायमुर्तीची कमिटी म्हणजे नेरोलेक्सचा व्हाईट वॉश लावण्यासाठीच आहे अशी खिल्ली उडविली आहे. परमविरसिंग यांनी केलेल्या आरोपातून अनिल देशमुख यांना क्लिन चिट देण्यासाठी ही कमिटी गठीत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली आहे. मग त्यांनी याबाबतच्या याचीकेवर आपले प्रतिज्ञापत्र सादरकरून सीबीआय चौकशीची मागणी करावी, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

२०१७ ला सुध्दा पोलीस दलातील बदल्यांसाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्यांचा बिमोड झाला. त्यावेळी २०१७ मध्ये एफआयआर दाखल झाले तेच आरोपी पुन्हा या रॅकेट मध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येते आहे. या रॅकेट मधील एकआरोपी बंदा नवाज हा का २०१७ च्या केसमध्ये आरोपी आहे. तो काँग्रेसचा कार्यकर्ता असून २०१७ च्या केसमध्ये त्याला अटक होऊ नये तसेच त्याला वाचवता यावे म्हणून कुंटे यांनी दिलेला अहवाल उपयुक्त ठरणार आहे. या निमित्ताने या केसमध्ये एक त्रिकोण पुर्ण झाले आहे. शिवसेनेशी संबंधित सचिन वाझे तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि आता काँग्रेसचा बंदा नवाज असे तिन्ही पक्षांचे चेहरे समोर आले आहेत, असा आरोपही आमदार आशिष शेलार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *