नवीन कृषी कायदे करून संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवा:

0
20210326_202309

नवीन शेतकरी कायदे करून संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवा:
मुंबई, दि. 26 मार्च:

मोदी सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे आता त्यांनी शेतक-यांशी चर्चा करून नवीन कृषी कायदे केले पाहिजेत. हे नवीन कृषी कायदे संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवावेत. जोपर्यंत हे नवीन कायदे होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर उपोषण करून मोदी सरकारचा धिक्कार केला. मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपोषण करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळी म्हणाले की, ‘ मोदी सरकारने शेतकरी व कामगार कायदे बदलून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या कायद्यासाठी कामगारांनी बलिदान दिले. ते कायदे बदलून मोदी सरकारने कामगार चळवळच मोडीत काढण्याचे पाप केले आहे. पेट्रोल, डिझेल हे पाकिस्तान, नेपाळमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे पण भारतात मात्र लुटमारी सुरू आहे.

मोदी सरकारचा निषेध करत काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्हा, तालुका मुख्यालयी उपोषण केले. या उपोषणाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *